0 1 min 6 yrs

      या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. [embed]https://www.youtube.com/watch?v=16_5VFqVMAk[/embed] या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———-Wasim Siddique (Fame Media)]]>